चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटली, 15 जणांचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटली, 15 जणांचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये 11 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. चालक नशेत असल्याने अपघाताची घटना घडली.

ब्राझीलमधील पेर्नाम्बुको येथे ही अपघाताची घटना घडली. पूर्व ब्राझीलमधील महामार्गावर चुकीच्या दिशेने बस चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या काही दगडांवर आदळली आणि उलटली. बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते, त्यापैकी 11 महिला आणि चार पुरुषांचा मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

सदर बस बाहिया राज्यातील असून पेर्नाम्बुको राज्यातील सालोआ येथे अपघातग्रस्त झाली. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. अपघातादरम्यान काही प्रवासी बसमधून बाहेर पडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटली, 15 जणांचा मृत्यू चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटली, 15 जणांचा मृत्यू
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये 11 महिला आणि 4...
जर तुम्ही एकाच वेळी 50 अंडी खाल्लीत तर काय होईल? सत्य जाणून धक्का बसेल
दापोलीत व्हेल माशाची उलटी जप्त; एका पोलीस कर्मचाऱ्यासह 4 आरोपींना अटक
दिल्लीत JNU विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांसोबत धक्काबुक्की; 28 विद्यार्थी ताब्यात
Mumbai News – बनावट सोन्याची बिस्किटे देऊन दागिने घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी देता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांना चिकन मसाला वाटप, भाविकांमधून तीव्र नाराजी; मंदिर समितीकडून बिव्हिजी कंपनीला नोटीस