नगरपालिका, नगरपंचायत नगराध्यक्षपदाची उद्या सोडत
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत सोमवार, दि. 6 रोजी मंत्रालय, मुंबई येथे काढण्यात येणार आहे. नगरविकास विभागाकडून याबाबतचे पत्र जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग आला असून, इच्छुकांमध्ये धाकधूक प्रचंड काढली आहे.
मंत्रालयीन सुरक्षेच्यादृष्टीने नगराध्यक्ष आरक्षण सोडतीला राजकीय पक्षांना फक्त दोन प्रतिनिधींची उपस्थिती मर्यादित करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष किंवा पक्षाचे सचिव यांनी नामनिर्देशित केलेल्या प्रतिनिधींनाच या सोडतीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण हा निवडणुकीच्यादृष्टीने निर्णायक टप्पा ठरतो. कोणत्या नगरपालिकेत किंवा नगर पंचायतीत नगराध्यक्षपद साधारण, इतर मागास, अनुसूचित जाती क अनुसूचित जमाती क त्यातही महिला असे आरक्षण पडते. यावरून पुढील राजकीय समीकरणे आखली जातात. मागील निवडणुकांत अनेक ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणात फेरबदल झाल्याने अनेक दिग्गजांचे पत्ते कापले गेले होते. त्यामुळे या वेळीही अनेक शहरांमध्ये कार्यकर्ते क इच्छुक उमेदकारांचे लक्ष या सोडतीकर खिळले आहे. सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीतून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मोठी यादी आहे. त्यामुळे या इच्छुकांमध्ये सोडतीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List