देश विदेश – युक्रेनला ‘टोमहॉक’ क्रूज मिसाइल नाही

देश विदेश – युक्रेनला ‘टोमहॉक’ क्रूज मिसाइल नाही

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत ट्रम्प यांनी झेलेंस्की यांना लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र ‘टोमहॉक’ क्रूज मिसाइल देण्यास नकार दिला आहे. पुढील आठवडय़ात डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन हे हंगरीची राजधानी बुडापेस्ट मध्ये भेटणार आहे. झेलेंस्की आणि पुतीन यांच्या थेट चर्चा होणे अवघड आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटलेय.

लढाऊ विमानासाठी 654 अब्जाची तरतूद

हिंदुस्थान सरकार पुढील दशकभरात लढाऊ विमानाच्या इंजिनाची खरेदी करणे आणि अन्य विकासावर तब्बल 654 अब्ज रुपये म्हणजेच 7.44 अब्ज डॉलर खर्च करणार आहे. हिंदुस्थानला आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच संरक्षण क्षेत्रात स्वदेशी क्षमतेला आणखी मजबूत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशाला विविध लढाऊ जेट कार्यक्रमासाठी जवळपास 1100 इंजिनची आवश्यकता आहे, असे डीआरडीओचे एसव्ही रमना मूर्ती यांनी म्हटले आहे.

 गरीब रथ एक्सप्रेसला पंजाबमध्ये आग

पंजाबच्या लुधियानाहून दिल्लीला जात असलेल्या गरीब रथ ट्रेनच्या डब्याला शनिवारी सकाळी पंजाबच्या सरहिंद स्टेशनजवळ आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले. आगीची माहिती समजताच लोको पायलटने तत्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. ट्रेन थांबताच प्रवासी डब्यातून खाली उतरले. या डब्यातून अनेक व्यापारी प्रवास करत होते. या दुर्घटनेत काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती समजताच रेल्वेची टीम घटनास्थळी पोहोचली व आगीवर नियंत्रण मिळवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा; शरीरात जाणवतील हे चार बदल दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा; शरीरात जाणवतील हे चार बदल
तूप आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. तुपामुळे आपल्या शरीरला खुपसारे फायदे मिळतात. आहारात तुपाचा समावेश असावा असं म्हटलं जातं. तुपाचे फक्त...
जर सतत थकवा जाणवत असेल तर, त्याची कारणे या आजारांशी संबंधित असू शकतात, अजिबात दुर्लक्ष करू नका
शाकाहारी ऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्याने रक्तरंजित थरार, तरुणाकडून हॉटेल मालकावर गोळीबार
Dapoli News – कार्तिकि उपवासाच्या 15 दिवस आधीच दापोलीत कणगरांची विक्री सुरू
मुलगी ऐकत नसेल तर तिचे पाय तोडून टाका, लव्ह जिहादवर साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त विधान
प्रियकरानेच विवाहित प्रेयसीला संपवलं, पुढे जे नवऱ्याने केलं ते वाचून बसेल धक्का…
मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर, फडणवीस मुख्यमंत्री, म्हणूनच ते निवडणूक आयोगाची पाठराखण करतात – हर्षवर्धन सपकाळ