महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका, स्वखर्चाने कचरा उचलण्याची अहिल्यानगरकरांवर वेळ

महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका, स्वखर्चाने कचरा उचलण्याची अहिल्यानगरकरांवर वेळ

महानगरपालिकेच्या निक्रियतेचा व स्वच्छता विभागाच्या भोंगळ कारभाराचा त्रास आता नागरिकांना स्वतःच्या खिशातून सोसावा लागत आहे. सावेडी, पाइपलाइन रोड, हनुमाननगर येथील रहिवासी राजेश सुखदेव पवार यांनी वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून कचरा उचलला गेला नाही म्हणून बारा लाख रुपये खर्च करून स्वतःचा ट्रक्टर घेऊन परिसरातील कचरा उचलण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे.

राजेश पवार म्हणाले, आमच्या घराच्या आवारात मोठमोठी झाडं आहेत. दर दोन महिन्यांनी झाडांचा पालापाचोळा, फांद्या आणि नारळाच्या शेंडी कापावी लागते; पण दर चार दिवसांनी येणारी घंटागाडी हा कचरा घेऊन जात नाही. महानगरपालिकेकडे झाडांचा पालापाचोळा उचलण्यासाठी स्वतंत्र गाडय़ा आहेत; पण त्या इथे कधीच येत नाहीत. कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पूर्वी आम्ही पैसे देऊन खासगी वाहनातून हा कचरा उचलून टाकत होतो; पण हे वारंवार घडू लागल्याने आता आम्हालाच नवीन ट्रक्टर ट्रॉली घ्यावी लागली. आम्ही कर वेळेवर भरतो, तरीही आम्हालाच हा खर्च करावा लागतो, हे प्रशासनाचे अपयश आहे, असे पवार यांनी सांगितले.

हनुमाननगर परिसरातील इतर नागरिकांनीही अशाच तक्रारी केल्या आहेत. झाडांच्या फांद्या, मोठा कचरा किंवा बांधकामातील अवशेष उचलण्यासाठी महानगरपालिकेच्या गाडय़ा कधीच दिसत नाहीत. परिसरातील कचरा वाढत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे, अशीही नाराजी व्यक्त करण्यात आली.

‘स्वच्छ शहर’चे फक्त दावे

महानगरपालिका ‘स्वच्छ शहर’चे दावे करत असली तरी प्रत्यक्षात नागरिकांना स्वतःच स्वच्छतेची जबाबदारी उचलावी लागत आहे. कर भरूनही सेवा न मिळणं ही नागरिकांची दुहेरी शिक्षा ठरत आहे. आम्ही ट्रक्टर घ्यायचा, कचरा उचलायचा आणि भरायचा… मग महानगरपालिकेचं काम नक्की काय? असा सवालही नागरिक करु लागले आहेत.a

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND vs AUS – विराट शून्य, रोहित आठ धावांवर बाद; 223 दिवसानंतर कमबॅक, पण अर्ध्या तासात पॅकअप IND vs AUS – विराट शून्य, रोहित आठ धावांवर बाद; 223 दिवसानंतर कमबॅक, पण अर्ध्या तासात पॅकअप
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात रविवारपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. पहिला सामना पर्थच्या ऑप्टस मैदानावर सुरू आहे. या...
दिवाळीत काजू, बदाम, मनुके खाताय… सावधान ! एपीएमसीत भेसळ; मसाला मार्केटमध्ये एफडीएचा छापा
मतं दिली नाही म्हणून कुणालाही नमकहराम म्हणणे चुकीचे, मोदींनी गिरीराज सिंह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी! – संजय राऊत
मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्राची जनता गद्दारांच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही! संजय राऊत यांचा मिंध्यांवर घणाघात
चार महिन्यांपासून प्रभारी डॉक्टर नाही, माथेरानच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे झाले खुराडे
दिवाळीची धूम; दीपोत्सव, आतषबाजी, खमंग फराळ, पुणे शहरात धन्वंतरी पूजनाने धनत्रयोदशी साजरी
देश विदेश – युक्रेनला ‘टोमहॉक’ क्रूज मिसाइल नाही