अमेरिकेमुळे हिंदुस्थानवर व्यापारी संकट, ‘टॅरिफ’चे परिणाम दिसू लागले, चार महिन्यांत निर्यातीत जबरदस्त घसरण
अमेरिकेने हिंदुस्थानावर लावलेल्या 50 टक्के ‘टॅरिफ’चा परिणाम आता दिसू लागला आहे. मागील चार महिन्यांत हिंदुस्थानच्या निर्यातीत मोठी घट झाली आहे. अमेरिकेत हिंदुस्थानातून होणारी निर्यात 37.5 टक्के घट आली आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हमधून (जीटीआरई) ही चिंताजनक बाब समोर आली आहे. जीटीआरईच्या अहवालानुसार अमेरिकेत हिंदुस्थानची निर्यात मे 2025 मध्ये 8.8 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी होती. ती सप्टेंबरमध्ये 5.5 अब्ज डॉलर एवढी राहिली आहे. म्हणजे चार महिन्यांत 3.3 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी निर्यात कमी झाली आहे. जूननंतर निर्यातीत 5.7 टक्के घसरण होऊन ती 8.3 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाली. जुलैमध्ये 3.6 टक्के घट होऊन ती 8 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाली. ऑगस्टमध्ये 13.8 टक्के घसरण होऊन ती 6.9 अब्ज डॉलर झाली, त्यानंतर सप्टेंबरमध्ये निर्यात आणखी खाली आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List