Pune News – धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान
वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरुवात झाली आहे. दरवर्षी परंपरेप्रमाणे धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक अलंकार परिधान करत असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी २ पदरी, शिरपेच मोठा १० लोलक असलेला, शिरपेच लहान, मस्त्य जोड, तोडे जोड, एकदाणी तुळशीची माळ ३ पदरी इत्यादि अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत. तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा, इत्यादि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
दिपावलीत वसुबारस, धनत्रयोदशी दिवाळी पाडवा, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवन, श्री.ज्ञानेश्वर दर्शन मंडप व भक्त निवास इत्यादि ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सदरचे अलंकार पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List