दिवाळी फराळावर ताव मारा, पण बेताने! तज्ज्ञांचा सल्ला

दिवाळी फराळावर ताव मारा, पण बेताने! तज्ज्ञांचा सल्ला

आनंद, समृद्धी अन् कृतज्ञतेचा सोहळा म्हणजे दिवाळी…! दिवाळी म्हटले की, फराळ हा ठरलेलाच असतो. फराळाशिवाय दिवाळीच साजरी होत नाही. खवय्यांसाठी दिवाळीचा फराळ म्हणजे पर्वणीच असते. चवदार, कुरकुरीत, खुसखुशीत, गोड पदार्थांवर सर्वजण मनसोक्त ताव मारतात. मात्र, अतिप्रमाणात फराळांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता असते. तेलकट व गोड पदार्थांमुळे घशाला त्रास जाणवणे, खवखव होणे, शुगर वाढणे, पोट बिघडणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दिवाळीत अतिप्रमाणात तेलकट, गोड पदार्थांचे सेवन टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

आकर्षक विद्युतरोषणाई, रांगोळीच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी, लहान मुलांनी घरासमोर साकारलेले किल्ले अन् दिव्यांचा लख्ख प्रकाश अशा तेजोमय वातावरणात सर्वत्र दिवाळी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. याबरोबरच चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळी, अनारसे, शंकरपाळी यांसारख्या पदार्थांचा सुगंध सर्व घरांमध्ये दरवळतो. घरी बनवलेल्या फराळामुळे दिवाळीची रंगत अधिक रूचकर बनते. नोकरी, व्यवसाय सांभाळताना होणाऱ्या धावपळीमुळे घरी फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकजण बाजारातील रेडिमेड फराळ, मिठाई खरेदी करून दिवाळी साजरी करतात. मात्र, बाजारातून आणलेले पदार्थ कसल्या तेलात तळले जातात, त्या तेलाच्या गुणवत्ता काय आहे? हे कोणालाही माहीत नसते. त्यामुळे असे पदार्थ खाण्यात आल्यास घशाला त्रास जाणवणे, खोकला लागणे, पोट बिघडणे यांसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारपेठांमधून दिवाळीसाठी मिठाई खरेदी करण्याऐवजी घरीच दिवाळीचा फराळ बनविला पाहिजे, अतिप्रमाणात तळलेले व गोड पदार्थ खाऊ नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले.

“अनेकजण बाजारातून रेडिमेड पदार्थ आणून दिवाळी साजरी करतात. मात्र, बाहेरून आणलेले पदार्थ बनविण्यासाठी कसले तेल वापरले जाते, हे कोणालाच माहीत नसते. कमी गुणवत्ता असलेल्या तेलाचा वापर केलेल्या पदार्थांमुळे घशाला त्रास होणे, खोकला लागणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी घरी फराळ बनवून दिवाळी साजरी केली पाहिजे. अतिप्रमाणात तेलकट, गोड पदार्थांचे सेवन करू नये.”

– डॉ. मिलिंद भोई, कान, नाक, घसा तज्ज्ञ

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND vs AUS – विराट शून्य, रोहित आठ धावांवर बाद; 223 दिवसानंतर कमबॅक, पण अर्ध्या तासात पॅकअप IND vs AUS – विराट शून्य, रोहित आठ धावांवर बाद; 223 दिवसानंतर कमबॅक, पण अर्ध्या तासात पॅकअप
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात रविवारपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. पहिला सामना पर्थच्या ऑप्टस मैदानावर सुरू आहे. या...
दिवाळीत काजू, बदाम, मनुके खाताय… सावधान ! एपीएमसीत भेसळ; मसाला मार्केटमध्ये एफडीएचा छापा
मतं दिली नाही म्हणून कुणालाही नमकहराम म्हणणे चुकीचे, मोदींनी गिरीराज सिंह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी! – संजय राऊत
मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्राची जनता गद्दारांच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही! संजय राऊत यांचा मिंध्यांवर घणाघात
चार महिन्यांपासून प्रभारी डॉक्टर नाही, माथेरानच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे झाले खुराडे
दिवाळीची धूम; दीपोत्सव, आतषबाजी, खमंग फराळ, पुणे शहरात धन्वंतरी पूजनाने धनत्रयोदशी साजरी
देश विदेश – युक्रेनला ‘टोमहॉक’ क्रूज मिसाइल नाही