भाईंदरमध्ये साकारले बाळासाहेब ठाकरे कलादालन; अॅम्पी थिएटर, ई-लायब्ररी, संगीत केंद्र, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, 17 नोव्हेंबरला नागरिकांसाठी खुले
शहरातील गोल्डनेस्ट या भागात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन साकारण्यात आले आहे. त्यासाठी १८० कोटी रुपये खर्च आला असून अॅम्पी थिएटर, ई-लायब्ररी, संगीत केंद्र, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याशिवाय शिवसेनाप्रमुखांची ऐतिहासिक भाषणे, व्यंगचित्रे तसेच शिवसेनेच्या स्थापनेवर आधारित प्रदर्शन हे या कल ादालनाचे वैशिष्ट्य आहे. भाईंदरमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व कलाकारांसाठी हे कलादालन वरदान ठरणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी नागरिकांसाठी कलादालन खुले होणार आहे.
या सुविधा मिळणार
ज्येष्ठ नागरिकांसाठी जुन्या गाण्यांचा संग्रह.
मल्टिमीडिया, ऑडियो, विज्युअल प्रदर्शन
अत्याधुनिक दृश्य व ध्वनियंत्रणा
अॅम्पी थिएटर
कॉन्फरन्स रूम
कॅफेटरिया
लॅण्डस्केप गार्डन.
कला, संस्कृती आणि नव्या पिढीच्या सर्जनशीलतेला वाव देणारे हे महाराष्ट्रातील पहिले कलादालन असल्याचे मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले. विशेष म्हणजे एआय तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी करण्यात आला आहे. दिवाळीच्या सुट्टीत फक्त विद्यार्थ्यांसाठी १८ ते २५ ऑक्टोबरदरम्यान हे दालन मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून यासाठी पूर्व नोंदणी करावी लागणार आहे. या कलादालनामध्ये शिवसेनाप्रमुखांची भाषणे सर्वांना ऐकता येतील. त्याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी झोनदेखील तयार केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List