सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? ही एक जीवघेणी स्थिती…लक्षणे आणि उपाय काय आहेत?
हार्ट अटॅक ही एक जीवघेणी आरोग्य स्थिती आहे. कारण कधी आणि कोणत्या कारणांनी हार्ट अटॅक येईल काही सांगता येत नाही. काही लक्षणे अशी असतात की त्यावरून आपण हे जाणू शकतो की हार्ट अटॅक असू शकतो आणि अलर्ट होऊन लगेच डॉक्टरांशी संपर्क करू शकतो किंवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होऊ शकतो. पण काहीवेळेला हार्ट अटॅक येण्याची परिस्थिती लक्षात येत नाही. अशी स्थिती खरंच जीवघेणी ठरू शकते. त्यालाच एकप्रकारे सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात.
सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय, त्याची लक्षणे काय असतात?
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे
नावाप्रमाणेच, सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका ज्याची कल्पना करता येत नाही. म्हणूनच लोक सहसा त्याकडे दुर्लक्ष करतात, ते सामान्य थकवा, गॅस किंवा स्नायू दुखणे आहे असे समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. हा सायलेंट हार्ट अटॅक असूनही, यामुळे हृदयाच्या स्नायूंचे गंभीर नुकसान होते. सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे सामान्य हार्ट अटॅकपेक्षा कमी असतात. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये तीव्र छातीत दुखणे, हात किंवा खांदे दुखणे यांसारखी लक्षणे फारशी दिसत नाहीत.त्यामुळे हा अंदाज घेणे थोडे कठीण जाते. आणि सामान्य म्हणून त्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ते जीवावर बेतत.
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे कशी असतात?
सायलेंट हार्ट अटॅकमध्ये, तुम्हाला अचानक खूप थकवा जाणवू शकतो, ज्यामुळे तुमच्या दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो.
सायलेंट हार्ट अटॅक आल्यास, तुम्हाला थोडासा दबाव जाणवू शकतो, जो सहसा गॅस, आम्लता किंवा स्नायू दुखणे आहे असं समजला जातो.
सायलेंट हार्ट अटॅक आल्यास अचानक चक्कर येणे आणि घाम येणे यासारखी लक्षणे देखील दिसू शकतात.
त्यामुळे अशी काही लक्षणे दिसली तर त्याकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करा.
सायलेंट हार्ट अटॅक टाळण्यासाठी उपाय
हे टाळण्यासाठी, आहारात काही महत्त्वाचे बदल केले पाहिजेत. आहारात हिरव्या भाज्या आणि ओमेगा-3 असलेले पदार्थ समाविष्ट करा आणि मीठ आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमी केला पाहिजे.
दिवसातून किमान 30 मिनिटे व्यायाम केल्याने तुम्हाला सायलेंट हार्ट अटॅकसारख्या गंभीर धोक्यांपासून संरक्षण मिळू शकते. तुम्ही चालणे, स्ट्रेचिंग, प्राणायाम आणि योगासारखे व्यायाम करू शकता.
धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे थांबवा, कारण या दोन्ही गोष्टींमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
महत्त्वाची टीप: जर तुम्हाला सायलेंट हार्ट अटॅकची कोणतीही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याऐवजी, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करा. तसेच कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा तुमच्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List