दोन तासांपेक्षा जास्त मोबाईल वापरण्यास मनाई! जपानच्या टोयोके शहरात आदेश जारी

दोन तासांपेक्षा जास्त मोबाईल वापरण्यास मनाई! जपानच्या टोयोके शहरात आदेश जारी

जपानमधील आइची येथील टोयोके शहरात नागरिकांना दिवसातून केवळ 2 तास स्मार्टफोन वापरण्याची परवानगी आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. मुलांसाठीही वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.  या निर्णयावर शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

स्मार्टफोनच्या अतिवापराला आळा घालण्यासाठी टोयोके महापौरांनी आदेश जारी केला आहे. त्यानुसार नागरिकांना मोबाईल फोन किंवा टॅब्लेटचा वापर दिवसातून 2 तासांपेक्षा जास्त न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महानगरपालिकेने ई-मेलद्वारे नागरिकांना त्यांच्या आरोग्याची आणि झोपेच्या वेळेची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच स्मार्टफोन किंवा इतर उपकरणांवर घालवलेल्या वेळेऐवजी कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा सल्ला दिला आहे. शिक्षकांना आणि स्थानिक प्रशासनाला पाठवलेल्या दुसऱया ई-मेलमध्ये म्हटले आहे की, हा अध्यादेश जारी करण्याचा मुख्य उद्देश लोकांची झोप पूर्ण व्हावी हा आहे.

लहान मुलांसाठी नियम

नियमानुसार 6 ते 12 वर्षांच्या मुलांना रात्री 9नंतर स्मार्टफोन आणि टॅब्लेट वापरण्याची परवानगी नाही. तर 12 वर्षांवरील लोकांसाठी ही वेळमर्यादा रात्री 10 वाजता निश्चित करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;