मुंबई महापालिकेच्या 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी! आजपासून अर्ज करता येणार
महापालिकेला भूखंडाच्या निवासी प्रकल्पातून बिल्डरकडून मिळालेल्या घरांमधील 426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी आजपासून 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. 26 ते 38 चौरस मीटर चटई क्षेत्र व अल्प आणि अत्यल्प गटासाठी असलेल्या या घरांची किंमत 54 लाखांपासून 1 कोटी 12 लाखांपर्यंत आहे.
विकास नियंत्रण नियमावली 15 अंतर्गत 4 हजार चौरस फुटापेक्षा मोठय़ा भूखंडावरील निवासी प्रकल्पातून विकासकाने 80 टक्के घरांची विक्री केल्यानंतर पालिकेला 20 टक्के घरे पालिकेला मोफत देणे अनिवार्य आहे. यानुसार पालिकेला 800 घरे मिळाली आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही लॉटरी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दरम्यान, या सोडतीसंदर्भात 022-22754553 या मदत सेवा क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा अथवा सहाय्यक आयुक्त (मालमत्ता), चौथा मजला, विस्तारित इमारत, पालिका मुख्यालय, फोर्ट इथे संपर्क साधावा.
20 नोव्हेंबरला सोडत
- 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून ऑनलाईन अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होईल. अर्जदारांना 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम 14 नोव्हेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल.
- पात्र अर्जदारांची अंतिम यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल आणि सोडत प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडेल. सोडतीसंदर्भात माहिती पुस्तिका 16 नोव्हेंबर रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List