शिंदे मालकाच्या घरातील सामान चोरून नेणारे नेते; NDA तील घटकपक्षाच्या नेत्यानं मिध्यांची लायकी दाखवली
बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यात आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. जनता दल युनाटेडचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार के.सी. त्यांगी यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत सहभागी होत महाराष्ट्रातील मुद्दा उपस्थित करत एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेत मिंध्यांना त्यांची लायकी दाखवून दिली आहे. शिंदे म्हणजे कोणत्याही पक्षाचे मालक नाहीत. ते मालक असूच शकत नाही. मात्र मालकाच्या घरातील सामान चोरून नेणारे नेते म्हणजे शिंदे आहे. हीच त्यांची ओळख आहे, अशा शब्दांत त्यागी यांनी मिंध्यांना त्यांची लायकी दाखवून दिली आहे. एनडीतील घटक पक्षानेच शिंदे यांची लायकी काढली आहे.
एकनाथ शिंदे हे प्रस्थापित नेतृत्व नाही, मालकांच्या घरात चोरी करणारे म्हणजे शिंदे आहेत. स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असणारे व्यक्ती म्हणजे शिंदे आहेत. मात्र, बिहारमध्ये नीतीशकुमार प्रस्थापित नेते असून त्यांनी स्वकष्टाने आणि पराक्रमाने राजकीय वजन प्राप्त केले आहे. त्यांनी अनेक पक्षांशी संघर्ष करत हे स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे नीतीश कुमार यांची शिंदे यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. हे शिंदे हे काही मालक नाही. ते कोणत्याही पक्षाचे मालक नाही. मात्र, मालकांच्या घरातून काही वस्तू चोरून अनेक वस्तू लांबवणारे शिंदे आहेत.तर नीतीश कुमार हे मालक आहेत. त्यांच्या कष्टाने त्यांनी पक्ष उभा केला आहे, असे त्यागी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List