आठवड्याभरात संपणारे युद्ध ते चार वर्षे लढत आहेत; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांची उडवली खिल्ली

आठवड्याभरात संपणारे युद्ध ते चार वर्षे लढत आहेत; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांची उडवली खिल्ली

टॅरिफचा मुद्दा, रशिया-युक्रेन युद्ध, चीन-अमेरिका वाढता संघर्ष यामुळे जागतिक वातावरण तापले आहे. अमेरिका- रशिया संबंध ताणले गेले असतानात आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची खिल्ली उडवली आहे. आठवड्याभरात संपणारे युद्ध ते चार वर्षे लढत आहेत, असा टोला ट्रम्प यांनी पुतिन यांना लगावला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यावर पुन्हा एकदा टीका करत त्यांची टर उडवली आहे.  पुतिन यांनी आता रशीयाने युक्रेनसोबतचे युद्ध तातडीने थांबवावे, युक्रेनच्या निष्पाप लोकांचा नरसंहार त्यांनी थांबवावा. त्यांना हे युद्ध एका आठवड्यात जिंकायला हवे होते मात्र त्यांना त्यासाठी चार वर्ष लागली. एका आठवड्यात संपणारे युद्ध ते चार वर्षे लढत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध ट्रम्प यांना दोन महिन्यांपूर्वीच संपवायचे होते. मात्र रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलेन्स्की यांच्यातील संघर्ष वाढल्याने ते शक्य झाले नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प संतापले असून रशियावर निर्बंध लादत इतर देशांना आपल्याकडे वळवण्याचा डाव ते खेळत आहेत. त्यानंतर रशिया अमेरिकेतील संबंध ताणले गेल्याने आता ट्रम्प यांनी पुतिन यांची टर उडवली आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलेन्स्की यांचा अडेलपट्टूपणा हेच युद्ध संपण्यात मोठी अडचण आहेत. मला वाटत होते आम्ही कराराच्या जवळ पोहोचलो आहोत. मात्र पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यात एकमेकांविषयी प्रचंड द्वेष आहे. तो एक अडथळा आहे. आम्हा सर्वांनाच पुतिन यांनी हे युद्ध संपवायला हवे असे वाटते. रशियाने युक्रेनमधील लोकांचा रक्तपात आता थांबायला हवा. या युद्धाने दोन्ही देशांच्या प्रतिमा मलिन होत आहे.

ट्रम्प पुढे म्हणाले की हिंदुस्थानने त्यांना आश्वासन दिले आहे की, ते रशियन तेल खरेदी करणार नाहीत.  हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले तर युद्ध थांबवणे सोपे होईल. एकदा युद्ध संपले की ते पुन्हा तेल खरेदी  करू शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पतंजली वेलनेसने कसे बदलले जीवन?, वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त लोकांनी आपले अनुभव सांगितले पतंजली वेलनेसने कसे बदलले जीवन?, वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त लोकांनी आपले अनुभव सांगितले
हरिद्वार स्थित पतंजली वेलनेस लोकांना नवे आयुष्य देत आहे. मोठ्या संख्येने विविध रोगांनी आजारी असलेल्यांना नवीन आयुष्य मिळत आहे. अशा...
केन विल्यम्सनचे IPL मध्ये पुनरागमन, लखनऊ सुपर जायंट्स सोबत बुद्धिचा डाव टाकणार
गुजरातच्या मंत्रिमंडळातली सर्व मंत्र्यांचे राजीनामे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपुर्वी भाजपचा मोठा निर्णय
मी तर कोंबडी चोर, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी नाकारली Y दर्जाची सुरक्षा
Nestlé चा मोठा निर्णय; 16 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार
प्रेमाला वयाचं बंधन नसतं…! 50 वर्षांचा गायक 16 वर्षांनी लहान गायिकेच्या प्रेमात, महिना अखेरीस उडणार लग्नाचा बार
Video – अन्यथा इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा – उद्धव ठाकरे