अमेरिकेचा पासपोर्ट टॉप 10 यादीतून बाहेर, हिंदुस्थान 80 वरून 85 व्या स्थानावर, चीनचे स्थान सुधारले
अमेरिकन पासपोर्ट पहिल्यांदाच हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या टॉप 10 यादीतून बाहेर पडला आहे. 20 वर्षांपूर्वीच्या स्थापनेपासून अमेरिका सतत वरच्या पातळीवर होता. जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्टपैकी एक मानला जाणारा अमेरिकन पासपोर्ट पहिल्यांदाच हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या टॉप 10 यादीतून बाहेर पडला आहे. 20 वर्षांपूर्वीच्या स्थापनेपासून अमेरिका सतत वरच्या पातळीवर होता, मात्र आता अमेरिकेचा पासपोर्ट 12 व्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिका आणि मलेशियाचा पासपोर्ट एकाच स्थानी आला आहे. ही घसरण जागतिक राजनैतिक पूटनीती आणि व्हिसा धोरणांमधील बदलांमुळे झाली आहे, ज्यामुळे अमेरिकन पासपोर्टची ताकद कमी झाली आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार अमेरिकन नागरिकांना 227 पैकी फक्त 180 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. मागील दशकात हे प्रमाण जास्त होते. ब्राझील, चीन, व्हिएतनामसारख्या देशांनी अमेरिकेच्या व्हिसा-मुक्त यादीतून नागरिकांना वगळले आहे.
हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार 57 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास असलेला हिंदुस्थानचा पासपोर्ट पाच स्थानांनी खाली आला आहे.
सिंगापूर (193 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास)
दक्षिण कोरिया (190)
जपान (189)
जर्मनी, इटली, लुक्झेमबोर्ग, स्पेन, स्वित्झर्लंड (188)
ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्प, फिनलँड, फ्रान्स, आयर्लंड, नेदरलॅण्ड्स (187)
ग्रीस, हंगेरी, न्यूझीलँड, नॉर्वे, पोर्तुगाल, स्वीडन (186)
ऑस्ट्रेलिया, झेक रिपब्लिक, माल्टा, पोलंड (185)
क्रोशिया, इस्टोनिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया, युएई, युके (184)
कॅनडा (183)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List