सहा महिन्यानंतर तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडले, डॉक्टर पतीनेच कट रचून केली हत्या
बेंगळुरु एक धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टरने आपल्या डॉक्टरकीचा उपयोग करुन आपल्याच पत्नीची हत्या केली आहे. आधी हा मृत्यू नैसर्गिक सांगण्यात आला त्यांनंतर सहा महिन्यांनी शवविच्छेदन अहवालात एनस्थेशियचे ड्रग सापल्यानंतर हत्येचा खुलासा झाला . पोलिसांनी आरोपी नवऱ्याला मणिपाल येथून अटक केली आहे.
कृतिका रेड्डी असे मृत महिलेचे नाव आहे. त्या बंगळुरूमधील व्हिक्टोरिया रुग्णालयामध्ये त्वचारोगतज्ज्ञ होत्या. तर त्यांचे पती डॉ. महेंद्र रेड्डी हे याच रुग्णालयात जनरल सर्जन होते. कृतिका काही दिवसांपासून आजारी होती. एप्रिल 2025 ची ही घटना असून कृतिका तिच्या वडिलांच्या घरी राहत होती. त्याच दरम्यान महेंद्रने दोन दिवस तिला आयव्ही इंजेक्शन दिले होते. त्यानंतर 23 एप्रिलला तिची तब्येत बिघडली आणि तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे गेल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले. त्यावेळी मराठाहल्ली पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती.
सहा महिन्यानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालात कृतिकाच्या शरीरामध्ये एनस्थेशिया ड्रग प्रोपोफोलचा अंश सापडले. हे औषध फक्त ऑपरेशन थिएटरमध्ये वापरले जाते. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आरोपी डॉक्टर महेंद्र रेड्डी याला मणिपाल येथून अटक करण्यात आली. कृतिकाची बहिण डॉक्टर निकिता रेड्डीला बहिणीचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने केस दाखल केली होती. तसेच तपासात आरोपी डॉक्टरच्या कुटुंबावर अनेक गुन्हे असून लग्नावेळी ते सर्व लपवले होते.
कृतिकाचे वडिल मुन्नी रेड्डी यांनी सांगितले की त्यांच्या मुलीने नवऱ्यावर विश्वास ठेवला होता. कृतिकाच्या कुटिंबियांनी त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आता पोलीस आरोपीकडून हत्येचा कट कसा रचला याबाबत जाणून घेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List