शिंदे गटाला ‘महाशक्ती’ने बहुदा दैवत आणि देवघर बदलण्याच्याच अटींवर चिन्ह आणि नाव दिले होते! – अंबादास दानवे

शिंदे गटाला ‘महाशक्ती’ने बहुदा दैवत आणि देवघर बदलण्याच्याच अटींवर चिन्ह आणि नाव दिले होते! – अंबादास दानवे

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अनेक योजना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच बंद झाल्या, तर काही थंड बस्त्यात गेल्या. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असून यामुळे अनेक योजनांवर फुली मारली जात आहे. याची यादीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी शेअर केला होती. आता त्यांनी आणखी दहा योजनांची यादी शेअर केली आहे. या सर्व योजना ‘नमो’ नावाने सुरू करण्यात आल्या होत्या. यावरून अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर कडाडून हल्ला चढवला आहे. शिंदे गटाला ‘महाशक्ती’ने बहुदा दैवत आणि देवघर बदलण्याच्याच अटींवर चिन्ह आणि नाव दिले होते, अशी टीका दानवे यांनी केली.

योजना बंद करणारं ‘चालू’ सरकार! शिंदेंच्या आणखी एका योजनेवर फडणवीसांची ‘फुली’, अंबादास दानवेंनी यादीच मांडली

अंबादास दानवे यांनी गुरुवारी सकाळी एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी शिंदे मुख्यमंत्री असताना मोदींच्या वाढदिवसाला सुरू केलेल्या आणि बंद पडलेल्या योजनांची नावे दिली आहेत.

या आणखी बंद योजना

१. नमो महिला सशक्तीकरण योजना – बंद
२. नमो कामगार कल्याण योजना – बंद
३. नमो शेततळे अभियान – बंद
४. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना – बंद
५. नमो ग्राम सचिवालय योजना – बंद
६. नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना – बंद
७. नमो दिव्यांग शक्ती योजना – बंद
८. नमो क्रीडा मैदान व उद्यान योजना – बंद
९. नमो शहर सौंदर्यकारण योजना – बंद
१०. नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना – बंद

या आहेत एकनाथ शिंदे यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घोषित केलेल्या योजना! असो.. विषय हा आहे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोन जन्मदिवस शिंदेंनी (घटनाबाह्य) मुख्यमंत्री म्हणून साजरा केले. तेव्हा या कटप्रमुखांना अश्या योजना घोषित कराव्या वाटल्या नाहीत? का बरं? शिंदे गटाला ‘महाशक्ती’ने बहुदा दैवत आणि देवघर बदलण्याच्याच अटींवर चिन्ह आणि नाव दिले होते, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;