पुणे शहरात अपात्र ठेकेदारांना रस्त्याचे काम
पुणे शहरातील प्रतिष्ठेच्या ‘पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर-२०२६’ सायकल स्पर्धेसाठी रस्तेदुरुस्ती आणि सुधारणा कामांच्या निविदेत ठेकेदाराचा स्वमालकीचा स्काडा ऑटोमेटेड बॅच मिक्स प्लाण्ट असणे अशी अट टाकली होती. मात्र, दोन ठेकेदारांकडे प्लाण्ट नसताना त्यांना अपात्रऐवजी पात्र केल्याचा आरोप आपले पुणे संस्थेने केला आहे.
पण या कामासाठी संबंधित ठेकेदाराचा स्वतःच्या मालकीचा स्काडा ऑटोमेटेड बॅच मिक्स प्लाण्ट असणे अशी अट टाकण्यात आली होती. पण या कामासाठी दोन ठेकेदारांनी स्वतःच्या मालकीचे बॅच मिक्स प्लाण्ट नसल्यामुळे अन्य प्लाण्टबाबत झालेले करारनामे जोडले आहेत. त्यामुळे हे दोन ठेकेदारांना अपात्र करणे आवश्यक होते. मात्र, पुणे पालिकेच्या पथ विभागाने अपात्र ठेकेदारांना पात्र केल्याचा आरोप ‘आपलेपुणे’ संस्थेने केला आहे.
याबाबत ‘आपले पुणे’ संस्थेचे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी पालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, या निविदा प्रक्रियेत निवड समितीच्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, उपायुक्त प्रशांत ठोंबरे आणि विठ्ठल चव्हाण उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List