कापडाच्या कारखान्याला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
बांगलादेशची राजधानी ढाका येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कापडाच्या कारखान्याला भीषण आग लागून 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ढाकाच्या मीरपूर भागातील सात मजली कापड कारखान्याला मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने धाव घेत बचावकार्य सुरू केले. अग्नीशमन दलाला कारखान्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर एकूण 16 मृतदेह आढळून आले. जखमींना तात्काळ ढाका येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी विभागात दाखल करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List