माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या पुस्तकाला मोदी सरकारची परवानगी नाही!

माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या पुस्तकाला मोदी सरकारची परवानगी नाही!

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आत्मचरित्रपर पुस्तकाला मोदी सरकारने अद्यापही परवानगी दिलेली नाही. एक वर्षाहून अधिक काळापासून हे पुस्तक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

हिमाचल प्रदेशातील कसौली येथे सुरू असलेल्या खुशवंत सिंह साहित्य महोत्सवाच्या वेळी नरवणे यांनीच ही माहिती दिली. डिसेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत लष्करप्रमुखपदी असलेल्या नरवणे यांनी आपल्या आठवणी व अनुभवांवर ‘पह्र स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पूर्ण होऊन प्रकाशकांकडे पाठवण्यात आले आहे. मात्र केंद्र सरकारच्या आक्षेपांमुळे त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही. या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व ऑर्डरही रद्द करण्यात आल्या आहेत.

अग्निवीर योजनेचे सत्य

मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ भरती योजनेबाबत नरवणे यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. लष्कराचा सल्ला डावलून सुरू केलेली ही राजकीय योजना होती. ‘अग्निवीर’ म्हणून भरती केल्या जाणाऱया जवानांपैकी 75 टक्के तरुणांना सेवेत कायम करण्याचा लष्कराचा प्रस्ताव होता. मात्र सरकारने केवळ 25 टक्के ‘अग्निवीरां’ना अवघ्या 20 हजार पगारावर कायम करण्याचा निर्णय घेतला. लष्कराने पाठपुरावा केल्यानंतर हा पगार 30 हजार करण्यात आला. सरकारच्या या योजनेला मोठा राजकीय विरोध झाला होता. त्यानंतर ही योजना लष्कराचीच असल्याचे चित्र सरकारने उभे केले होते. तेही नरवणे यांनी पुस्तकाच्या माध्यमातून खोडून काढले आहे.

माझं काम झालंय!

‘माझं काम पुस्तक लिहिणं आणि ते प्रकाशकांना देणं एवढंच होतं. ते मी केलंय. आता परवानगी मिळवण्याचं काम प्रकाशकांचं आहे. प्रकाशकांनी पुस्तक संरक्षण मंत्रालयाकडं पाठवलं आहे. वर्षभराहून अधिक काळापासून संरक्षण मंत्रालय पुस्तकाचा आढावा घेत आहे. मी लिहिण्याचा आनंद घेतला. ते चांगले आहे की वाईट माहीत नाही. संरक्षण मंत्रालयाला योग्य वाटेल तेव्हा ते परवानगी देतील,’ असे नरवणे यांनी सांगितले.

नरवणे यांच्या पुस्तकात काय?

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, या पुस्तकात लष्कराच्या संवेदनशील कारवाया आणि सरकारी धोरणांबद्दलची चर्चा आहे. 2020 मध्ये हिंदुस्थान व चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या वेळी सरकार व लष्करी अधिकाऱयांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेचा तपशील आहे. चिनी सैन्याच्या कारवायांच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी रात्री उशिरा झालेल्या संभाषणाचाही यात समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस डायरी – रक्तरंजित पुण्यात… मंत्र्यांकडून शस्त्र परवाना, सौदेबाजीचे गूढ ! पोलीस डायरी – रक्तरंजित पुण्यात… मंत्र्यांकडून शस्त्र परवाना, सौदेबाजीचे गूढ !
>> प्रभाकर पवार  देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्याच फडणवीस...
दुसऱ्याशी बोलते म्हणून प्रेयसीवर हातोड्याचे घाव, विकृत प्रियकराला अटक
यंदा कडाक्याची थंडी! हिमालयाचा 86 टक्के भाग बर्फाने झाकलेला, 110 वर्षांतील तिसरी तीव्र थंडी
पर्यटनाला महागाईचा मार, दिवाळी सुट्ट्यांच्या बुकिंगमध्ये 40 ते 50 टक्के घट
तालिबान-पाकिस्तान युद्धाला पुन्हा सुरूवात; कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकवटले
स्पेसएक्सच्या स्टारशिपचे यशस्वी उड्डाण, मंगळ आणि चंद्र मोहिमांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
आता इंटरनेटशिवाय होणार पेमेंट, आरबीआयने लाँच केला ऑफलाइन डिजिटल रुपया