संग्राम जगताप यांना दौरा रद्द करून मुंबईत हजर राहण्याचे आदेश

संग्राम जगताप यांना दौरा रद्द करून मुंबईत हजर राहण्याचे आदेश

गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली ठाम आणि आक्रमक भूमिका आता पक्ष नेतृत्वाच्या रडारवर आली आहे. हिंदुत्ववादी भूमिका आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांना बीडचा नियोजित दौरा रद्द करून तत्काळ मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत.

जगताप यांच्या वक्तव्यांमुळे अजित पवार गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी जगताप यांना नोटीस बजावली होती. त्यानंतरही त्यांनी आपली भूमिका आक्रमक करत हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर उघडपणे बोलायला सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर आज बीड येथे नियोजित असलेला जगताप समर्थकांचा मोर्चा रद्द करण्यात आला असून, जगताप यांनी तातडीने मुंबई गाठावी, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;