गुगल मॅपला टक्कर देणारे स्वदेशी मॅपल्स
iegieue मॅप्सला टक्कर देणाऱ्या एका स्वदेशी अॅप्सची सध्या देशभरात चर्चा आहे. ‘मॅपल्स’ असे या अॅपचे नाव आहे. मॅपमायइंडिया या हिंदुस्थानी कंपनीने तयार केलेल्या या अॅपमध्ये व्हॉईस गाइडेड नेव्हिगेशन, रिअल-टाइम ट्रफिक अपडेट्स आणि हायपर-लोकल सर्च अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळेच हे अॅप गुगल मॅप्सचा मजबूत असा स्वदेशी पर्याय ठरत आहे.
‘मॅपल्स’ अॅप उपक्रम डिजिटल आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असा दावा सरकारने केला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लवकरच रेल्वेसोबत करार करण्यात येईल. त्यामुळे रेल्वे स्थानके आणि मार्गांच्या नेव्हिगेशनमध्येही अधिक अचूकता येईल. याअंतर्गत देशातील दर 3.8 किमीसाठी एक डिजिटल कोड दिला जाणार आहे. युजर्स मॅपला फक्त पिन लावून आपला डिजिटल अॅड्रेस तयार करू शकतात. त्यामुळे घर, मजला किंवा इमारती अचूकपणे ओळखता येतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List