राजस्थानात एसी बस पेटली; 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू 16 प्रवासी गंभीर जखमी
राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर मंगळवारी एसी स्लिपर बसला लागलेल्या आगीत तब्बल 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर, 15 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिला व चार मुलांचा समावेश आहे. बहुतेक जखमी 70 टक्के भाजलेले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातग्रस्त बसमध्ये एकूण 57 प्रवासी होते. जैसलमेरहून निघाल्यावर दहा मिनिटांतच बसच्या मागील बाजूने धूर येऊ लागला. चालकाला हे समजताच त्याने बस रस्त्याच्या कडेला लावली. मात्र काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. काही लोकांनी खिडकीतून उडय़ा मारल्या. मात्र, हवेमुळे आग इतकी झटपट पसरली की बहुतेक प्रवाशांना बाहेर पडताच आले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List