राजस्थानमध्ये धावत्या बसमध्ये अग्नीतांडव, 12 प्रवाशांचा मृत्यू; काही जण गंभीर जखमी
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. धावत्या बसला लागलेल्या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून काही जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवाहिर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर बस जैसलमेरहून जोधपूरला चालली होती. बसमध्ये एकूण 57 प्रवासी होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जोधपूरकडे जात असतानाच वार म्युझियमजवळ अचानक बसमधून धूर निघू लागला आणि पाहता पाहता बस आगीच्या भक्षस्थानी गेली. बसला आग लागताच काही प्रवाशांनी खिडकी आणि दरवाजातून बाहेर उड्या घेतल्या. मात्र काही जण आगीत अडकले. नागरिकांनी पोलीस आणि अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली.
अग्नीशमन दलाने घटनास्थळावर दाखल होत आग विझवली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती मिळते. पुढील तपास सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List