जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल आणि प्रदूषणाबाबत तातडीने अहवाल द्या, जिल्हा प्रशासनाच्या मेरीटाईम बोर्ड आणि प्रदूषण मंडळाला सूचना

जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल आणि प्रदूषणाबाबत तातडीने अहवाल द्या, जिल्हा प्रशासनाच्या मेरीटाईम बोर्ड आणि प्रदूषण मंडळाला सूचना

जयगड येथील जिंदाल कंपनीच्या प्रदूषणाबाबत आणि बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे गॅस टर्मिनल उभारण्याकरिता खोटे प्रमाणपत्र प्राप्त केल्याचा आरोप माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. यानंतर जिल्हा प्रशासनाने आरोपांची गंभीर दखल घेत प्रदूषणाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्या आहेत. गॅस टर्मिनलबाबतच्या प्रमाणपत्राचा अहवाल महाराष्ट्र सागरी मंडळाकडे मागितला आहे.

रत्नागिरीत झालेल्या हक्कयात्रेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जिंदाल कंपनीच्या प्रदूषणावर हल्लाबोल केला. जिंदाल कंपनीच्या संदर्भातील एक निवेदनही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. या निवेदनाला प्रशासनाने तातडीने प्रतिसाद दिला आहे. जिंदाल कंपनीतून बाहेर पडणारी राख आंब्याच्या झाडावर बसून आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला. त्याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांना पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जयगड किल्ल्याला जे तडे गेलेले आहेत त्याची पाहणी करून सविस्तर अहवाल देण्याचा सूचना निवासी जिल्हाधिकारी यांनी पुरातत्व विभागाला दिल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;