वजन कमी करण्यासाठी तुमच्या आयुष्यात ‘हा’ सकारात्मक बदल करायलाच हवा
आजच्या वेगवान जीवनशैलीत, लोक भरपूर प्रक्रिया केलेले अन्न खातात. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना बिस्किटे, चिप्स, मिठाई आणि इतर असंख्य पदार्थांचा सामना करावा लागतो. प्रक्रिया केलेल्या अन्नात कॅलरीज जास्त, अस्वास्थ्यकर चरबी आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या आहारामुळे लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह आणि हृदयरोग यासारख्या आजारांचा धोका वाढतो.
आपण कुठेही बाहेर गेल्यावर, पटकन हातात चिप्स किंवा तळलले पदार्थ खातो. यापेक्षा इतर काही निरोगी आहाराचा पर्याय हा महत्त्वाचा मानला जातो. निरोगी आहारात खूप सारे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत.
प्रथिने आणि फायबरने पूरक असे भाजलेले कुरकुरीत चणे हा सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे. वजन कमी करण्यासाठी आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी चणे हे खूप फायदेशीर मानले जातात.
पॉपकॉर्न हे सुद्धा फायबरने समृद्ध असलेले आहेत. त्यामुळे हा सर्वात निरोगी पर्याय मानला जातो.
बदलत्या वातावरणाला सामोरे जाताना आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत
बदाम, अक्रोड आणि काजू हा सुकामेवा बटाट्याच्या चिप्ससाठी उत्तम पर्याय आहे. यात निरोगी चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे आपले हृदय, यकृत आणि मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
प्रथिने, प्रोबायोटिक्स आणि पॉलीफेनॉलने समृद्ध, बेरीसह दही हे आपल्या यकृताच्या आरोग्यासाठी चांगले आहे. हे दही नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
बटाट्याच्या चिप्सऐवजी, भोपळा, सूर्यफूल, चिया किंवा अळशीच्या बिया खा. यामध्ये फायबर, निरोगी चरबी आणि ओमेगा-३ भरपूर असतात. हे आपल्याला ऊर्जा प्रदान करण्यास तसेच आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.
बटाट्याच्या चिप्सऐवजी गाजर, काकडी हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे.
चिप्सऐवजी ७० टक्के कोको डार्क चॉकलेट खाणे हे सर्वात उत्तम मानले जाते. पॉलिफेनॉल आणि मॅग्नेशियम भरपूर असते. शिवाय गोड खाण्याची इच्छा देखील दूर होते आणि जास्त साखरही शरीरात जात नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List