आता इंटरनेटशिवाय होणार पेमेंट, आरबीआयने लाँच केला ऑफलाइन डिजिटल रुपया

आता इंटरनेटशिवाय होणार पेमेंट, आरबीआयने लाँच केला ऑफलाइन डिजिटल रुपया

मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक ऐतिहासिक पाऊल उचलत ऑफलाइन डिजिटल रुपया (ई-रुपे) लॉन्च केला. या नव्या सुविधेमुळे आता इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कशिवायही डिजिटल पेमेंट करणे शक्य होणार आहे. आरबीआयचा हा नवा उपक्रम भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे.

डिजिटल रुपया हा आपल्या रुपया चलनाचा डिजिटल अवतार आहे. याचा उपयोग अगदी आपल्या खिशातल्या रोकड पैशांसारखाच करता येतो. फरक एवढाच की, तो डिजिटल स्वरूपात असतो. तुम्ही तो आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवून ऑफलाइन वापरू शकता. प्रत्येक व्यवहारासाठी बँक खाते उघडण्याची गरज नाही. युजर्स हे वॉलेट अ‍ॅप्स त्यांच्या गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात.

पेमेंट कसे करायचे?

ऑफलाइन डिजिटल रुपया वापरताना क्यूआर कोड स्कॅन करून किंवा फक्त टॅप करून व्यवहार करता येईल. इंटरनेट कनेक्शन नसतानाही व्यवहार यशस्वीपणे पूर्ण होईल. यामुळे हे चलन कॅशसारखेच वापरणे शक्य आहे.

ग्रामीण भागाला दिलासा

या नव्या सुविधेचा सर्वाधिक फायदा ग्रामीण आणि दुर्गम भागांतील लोकांना होणार आहे, जिथे इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क मर्यादित असते. डिजिटल रुपयाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ‘ऑफलाइन पे’ फीचर. डिजिटल रुपया आता देशातील अनेक बँकांमध्ये डिजिटल वॉलेट स्वरूपात उपलब्ध होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;