Kolhapur News दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून आईच्या डोक्यात घातला वरवंटा
दारूसाठी पैसे देत नसल्याने एका तरुणाने जन्मदात्या आईच्या डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर येथे घडली आहे. सावित्रीबाई अरुण निकम (५३) असे त्या दुर्दैवी आईचे नाव आहे.
दरम्यान खून करणारा निर्दयी मुलगा विजय निकमला राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. मुलानेच आईचा खून केल्याची माहिती पसरताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. डोक्यात वरंवटा घातल्याने सावित्रीबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनास्थळी पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी आणि पंचनामा करण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List