पर्यटनाला महागाईचा मार, दिवाळी सुट्ट्यांच्या बुकिंगमध्ये 40 ते 50 टक्के घट

पर्यटनाला महागाईचा मार, दिवाळी सुट्ट्यांच्या बुकिंगमध्ये 40 ते 50 टक्के घट

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासह फिरायला जाण्याकडे अनेकांचा कल असतो. दिवाळी पर्यटन ही संकल्पना आपल्याकडे रुजली आहे. यंदा मात्र दिवाळी पर्यटनाकडे नागरिक सावधगिरीने वळताना दिसत आहेत. महागाई, टुर पॅकेजच्या वाढलेल्या किमती, आंतरराष्ट्रीय तणाव, टॅरिफचा फटका अशा काही बाबी पाहत सध्या लोकांनी सहलीचा विषय ऑप्शनला टाकलेला दिसतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळी सहलींमध्ये 40 ते 50 टक्के घट झाल्याचे टुरिस्ट कंपन्यांचे म्हणणे आहे.

आपल्याकडे सहकुटुंब सहलीला जाण्याचे दोन सीझन असतात. उन्हाळ्याची सुट्ट्या आणि दिवाळीची सुट्टी. सहामाही परीक्षा झाल्यावर दिवाळीची सुट्टी सुरू होते. या काळात बजेटनुसार देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय सहली निवडल्या जातात. तसे बुकिंग केले जाते. ज्या लोकांची देशातील प्रमुख ठिकाणे फिरून झाली आहेत ते सिंगापूर, थायलंड, दुबई अशा अल्प काळाच्या आंतरराष्ट्रीय सहलींपासून सुरुवात करतात. बजेट जास्त असेल तर स्वित्झर्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा मोठ्या सहलींकडे वळतात. यंदा मात्र सहलींसाठी इन्क्वायरी किंवा बुकिंगचे प्रमाण कमी झाले. यामागे महागाई आणि त्यामुळे वाढलेले पॅकेज दर हे कारण आहे. याविषयी महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वजित पाटील म्हणाले, महागाई हे कारण तर आहेच, पण अन्य कारणेही आहेत.

पहेलगाम हल्ल्यानंतर आमचा सीझन कोसळला होता. त्यातून सावरतोय तर एअर इंडिया विमान कोसळल्याची घटना घडली. युद्ध, अमेरिकेने लावलेले टॅरिफ अशी अनेक कारणे आहेत. लोकांच्या मनात भीती असते. परिणामी चौकशीचे कॉल्स आणि बुकिंग कमी झाले आहे.

उत्तरेकडे पुराचा फटका

  • यंदा उत्तरेकडील सहलींना फटका बसल्याचे केसरी टुर्सचे शैलेश पाटील यांनी सांगितले. पाऊस, पुरामुळे उत्तरेकडील राज्यांत बुकिंग नाही. मात्र केरळ, गोवा, गुजरातला चांगली पसंती आहे. दुबई, सिंगापूर, थायलंड आदी टुर फुल्ल असल्याचे ते म्हणाले.
  • अलीकडच्या वर्षांत हिंदुस्थानचा आंतरराष्ट्रीय प्रवासही वाढला असल्याचे दिसून येत आहे. यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम ही हिंदुस्थानी लोकांची प्रमुख पसंतीची ठिकाणे ठरली आहेत.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिल्लीकरांसाठी खूशखबर! दिवाळीत पर्यावरणपूरक फटाक्यांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी दिल्लीकरांसाठी खूशखबर! दिवाळीत पर्यावरणपूरक फटाक्यांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
दिवाळीआधी दिल्लीकरांना सर्वोच्च न्यायालयाने खूशखबर दिली आहे. या दिवाळीत दिल्ली-एनसीआरमध्ये फक्त प्रमाणित पर्यारवणपूरक फटाके ( Green Firecrackers) वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने...
वजन कमी करण्यासाठी तुमच्या आयुष्यात ‘हा’ सकारात्मक बदल करायलाच हवा
नालासोपार्‍यात प्रियकर आणि अल्पवयीन प्रेयसीने जीवन संपवले
Bihar Election 2025- प्रशांत किशोर यांनी फुंकले रणशिंग; पक्षाला 150 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर तो माझा पराभव, मात्र…
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; सेन्सेक्स, निफ्टीची उसळी
बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाच्या पालकमंत्रीपदाचा दिला राजीनामा
बिबट्याच्या हल्यात तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू, वनविभागाची दिरंगाई नागरिकांच्या जीवावर