मित्रासोबत फ्लॅट पहायला गेला अन् 31व्या मजल्यावरून कोसळला, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जागीच मृत्यू
मित्रासोबत भाड्याचा फ्लॅट पहायला गेलेल्या इंजिनिअरचा इमारतीच्या 31 व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सत्यम त्रिपाठी असे मयत इंजिनिअरचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस सखोल तपास करत आहेत.
नोएडा सेक्टर 2 मधील एका आयटी फर्ममध्ये 25 वर्षीय सत्यम त्रिपाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. सत्यम मित्र कार्तिकसोबत गाझियाबादच्या इंदिरापूरमध्ये त्याच्या बहिणीसाठी भाडेतत्वावर फ्लॅट पहायला गेला होता. यावेळी सत्यमला फोन आल्याने तो बेडरुममध्ये बोलायला गेला.
बराच वेळ होऊनही तो बाहेर आला नाही म्हणून कार्तिक आणि प्रॉपर्टी एजंटने बेडरुममध्ये जाऊन पाहिले. सत्यम बेडरुममध्ये कुठेही दिसला नाही. कार्तिक आणि प्रॉपर्टी एजंटने बाल्कनीतून पाहिले असता खाली लोकांची गर्दी दिसली. दोघांनी खाली जाऊन पाहिले असता पार्किंग परिसरात त्यांना सत्यमचा मृतदेह दिसला. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List