चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांचे निधन
प्रसिद्ध साहित्यिक व चित्रपट निर्माते अरुण गोडबोले (81) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या गोडबोले यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
सतत नावीन्याचा ध्यास घेतलेल्या गोडबोले यांनी कौशिक चित्र या बॅनरद्वारे चित्रपट निर्मिती केली. या संस्थेमार्फत त्यांनी कशासाठी प्रेमासाठी, नशीबवान, धुमाकूळ, बंडलबाज आणि राम रहीम हे 5 मराठी आणि एका हिन्दी चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपट निर्मितीबाबत त्यांनी सिनेमाचे दिवस हे पुस्तकही लिहिले आहे.
गोडबोले यांनी येथील दि युनायटेड वेस्टर्न बँक, आयुर्वेदिय अर्कशाळा, सज्जनगडचे समर्थ सेवा मंडळ, अंत्यसंस्कार सहायक मंडळ अशा अनेक संस्थांमध्ये विविध पदांची जबाबदारी सांभाळली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List