देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या; राष्ट्रवादीचे सरकारविरुद्ध आंदोलन
महाराष्ट्राचे गृहमंत्री खंडणी, दरोडा, अपहरण, खून, गोळीबार असे गंभीर गुन्हे करणाऱ्या नीलेश घायवळसारख्या गुन्हेगारांना परदेशात पळवून लावण्यासाठी कार्यरत आहेत, तर दुसरीकडे देशाचे गृहमंत्री सत्तेच्या बळावर सोनम वांगचुक यांच्यासारख्या समर्पित देशभक्त व ‘मॅगसेसे’ पुरस्काराने देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तिमत्त्वास राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासारख्या कठोर कायद्याअंतर्गत तुरुंगात डांबत आहेत. या अराजकतेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
देशात व महाराष्ट्रात सुरू असलेली ही अराजकता हिंदुस्थानसारख्या महान लोकशाही देशासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. या अराजकतेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध केला. देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना अभय देत आहेत, त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात उदय महाले, अनिता पवार, रमीझ सय्यद, किशोर कांबळे, हेमंत बधे, शैलेंद्र बेल्हेकर, प्रसाद कोद्रे, पप्पू घोलप, आसिफ शेख, डॉ. शशिकांत कदम, युसूफ शेख, रूपाली शेलार, नरेंश पगडालू, गणेश नलावडे आदी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List