चांदीला झळाळी! सोन्याची दिवाळी!!
चांदीला झळाळी आली आहे, तर सोन्याची दिवाळी पहायला मिळत आहे. सोन्या-चांदीचे दर दररोज नवनवे उच्चांक गाठत आहेत. या वर्षात सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त तेजी आली आहे. सोन्या-चांदीने एक लाखाचा टप्पा याआधीच पार केला असून आता चांदीची दोन लाखांच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दिवाळीपूर्वीच सोन्या-चांदीच्या दराचे फटाके फुटत आहेत.
सराफ बाजारातही सोन्या आणि चांदीच्या दराने आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सलग दुसऱया दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. चांदीने एका दिवसात तब्बल दहा हजारांची वाढ नोंदवली आहे.
- जागतिक अस्थिर परिस्थिती आणि शेअर बाजारातील दबावामुळे अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे वळत आहेत. त्यामुळे मागणी वाढल्याने वायदे बाजारात सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. त्याचा परिणाम सराफा बाजारावरही दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जागतिक अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.
- सोन्याच्या दरात 1800 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 30 हजार रुपयांवर पोहोचले आहेत, तर बाजारात चांदीची मागणी वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात पुरवठा नसल्याने चांदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तसे काही ठिकाणी आगाऊ पैसेही घेतले जात आहेत. त्यामुळे चांदीने उच्चांक गाठला आहे. चांदीचे दर 1 लाख 94 हजारांवर पोहोचले असून दिवाळीत चांदी दोन लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List