अनफिट नवीन-उल-हक स्पर्धेबाहेर
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक खांद्याच्या दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेमधून बाहेर फेकला गेला आहे. तो अनफिट असल्याचे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने जाहीर करताना हक या संपूर्ण स्पर्धेसाठी अनफिट असल्याचे घोषित केले. त्याच्या जागी राखीव संघातील तरुण वेगवान गोलंदाज अब्दुल्ला अहमदजईची मुख्य संघात निवड झाली आहे. नवीनने आत्तापर्यंत 48 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 67 विकेट घेतले आहे. अफगाणिस्तानने आपला मोहिमेची सुरुवात अबू धाबीतील सामन्यात हाँगकाँगवर 94 धावांनी विजय मिळवत केली आहे. अफगाणिस्तानचा पुढचा सामना मंगळवारी 16 सप्टेंबरला बांग्लादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्याचा निकाल ग्रुप-बी मधून सुपर-4 प्रवेशाच्या समीकरणासाठी निर्णायक ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List