Gangotri Glacier हवामान बदलामुळे 10 टक्के वितळले, संशोधनात धक्कादायक खुलासा

Gangotri Glacier हवामान बदलामुळे 10 टक्के वितळले, संशोधनात धक्कादायक खुलासा

गंगोत्री ग्लेशियर संदर्भात नुकताच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आयआयटी इंदूर आणि आंतरराष्ट्रीय सहयोगींच्या मदतीने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, गेल्या ४० वर्षांत गंगोत्री ग्लेशियर हे सुमारे 10 टक्के वितळले आहे. या अभ्यासाचे नेतृत्व डॉ. पारुल विंजे (ग्लॅसी-हायड्रो-क्लायमेट लॅब, आयआयटी इंदूर) यांनी केले. त्यात चार अमेरिकन विद्यापीठे आणि नेपाळमधील आयसीआयएमओडीचे शास्त्रज्ञ देखील समाविष्ट होते. हे संशोधन जर्नल ऑफ द इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेन्सिंगमध्ये प्रकाशित झाले आहे. यामध्ये गंगोत्री हिमनदी प्रणाली (GGS) चे १९८०-२०२० मधील उपग्रह डेटा आणि वास्तविक डेटा वापरून विश्लेषण करण्यात आले.

अभ्यासातून अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. यांतर्गत असे दिसून आले की, हवामान बदलामुळे हिमालयीन प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी कमी होत आहे. उन्हाळ्यात लवकर बर्फ वितळल्याने प्रवाहाची वेळ बदलली आहे. दीर्घकाळात बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी होत आहे आणि पावसावरील अवलंब वाढत आहे. मे २०२५ मध्ये द क्रायोस्फीअर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात २०१७-२०२३ दरम्यान गंगोत्री ग्लेशियरच्या पाण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे नोंदवले गेले आहे.

गंगोत्री ग्लेशियर वितळणे हा केवळ वैज्ञानिक चिंतेचा विषय नाही. तर उत्तर हिंदुस्थानातील जलसुरक्षेशी संबंधित प्रश्न आहे. लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान गंगा खोऱ्यातील शेतीवर अवलंबून आहे. यावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच याचा परिणाम जलविद्युत प्रकल्पांवर होण्याची दाट शक्यता आहे. उंच पर्वतीय भागात आणि मैदानी भागात पाण्याची उपलब्धता कमी होऊ शकते. संशोधक मोहम्मद फारूक आजा यांच्या मते, बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी होणे हे हवामान बदलाचे थेट लक्षण आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन आणि हिमनदी संवर्धनासाठी धोरण आखण्याची वेळ आली आहे असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ‘या’ गोष्टींचा अवलंब केल्याने तुम्हाला गॅसच्या समस्येपासून मिळेल आराम तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ‘या’ गोष्टींचा अवलंब केल्याने तुम्हाला गॅसच्या समस्येपासून मिळेल आराम
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना गॅसच्या समस्या सतावू लागल्या आहेत. त्यामुळे बहुतेकजणांना सकाळी उठल्याबरोबर पोटात जडपणा जाणवतो. कारण चुकीच्या खाण्याच्या सवयी...
एलफिन्स्टनचा पूल 12 सप्टेंबरच्या रात्रीपासून वाहतूकीसाठी बंद होणार
सायबर ठगांनी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या वकिलांनाही गंडवलं, अ‍ॅप डाऊनलोड करायला लावून लाखो रुपयांची फसवणूक
Nepal Protest – हिंसाचारात काठमांडूतील 5 अब्जांचं 5 स्टार हिल्टन हॉटेल उद्धवस्त
सरकारने काढलेल्या GR मधून कुणालाही सरसकट आरक्षण मिळणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
Photo – लालबागचा राजाच्या चरणी अर्पण झालेल्या दानाचा लिलाव
Asia Cup 2025 – UAE ला चकवा देणाऱ्या खेळाडूचा सन्मान, गोलंदाजी प्रशिक्षकाने दिला Impact Player Of The Match चा पुरस्कार