मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
मराठी सिनेसृष्टीवर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिया मराठेच्या स्वरुपात दु:खाचा डोंगर कोसळला होता. प्रिया मराठेच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरणार तोच आता आणखी एक अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या अवघ्या 55 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकारांसोबत आपल्या अभिनायची छाप पाडली आहे.
आशिष वारंग यांनी सूर्यवंशी, सर्कस, सिंबा, मर्दानी, एक व्हिलन रिटर्न्स या हिंदी सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भुमिका अगदी चोख पार पाडली. त्यामुळे चाहत्यांनी सुद्धा त्यांच्या अभिनयाचं तोंड भरून कौतुक केलं. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणवीस सिंग, कतरिना कैफ, अजय देवगण आणि राणी मुखर्जीसह अनेक कलाकारांसोबत त्यांनी काम केलं आहे. त्यांची पात्र छोटी असली तरी ती प्रभावी होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. गुरुवारी (5 सप्टेंबर 2025) त्यांच्या निधनाची माहिती कळताच अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List