Ratnagiri News – गणेशोत्सवातील निर्माल्य कलशात गोळा करण्याचा उपक्रम, कलमठ ग्रामपंचायतीचा निर्णय 

Ratnagiri News – गणेशोत्सवातील निर्माल्य कलशात गोळा करण्याचा उपक्रम, कलमठ ग्रामपंचायतीचा निर्णय 

कणकवली मधील कलमठ ग्रामपंचायत च्या वतीने गणेशोत्सवाच्या काळातील गणेशाचे निर्माल्य घरोघरी संकलन करण्यासाठी निर्माल्य कलश रथ तयार करून घरोघरी जात निर्माल्य संकलन सुरु करण्यात आले आहे.

भव्य कलश, सजलवेला रथ घेऊन ग्रामपंचायत सुमारे 200 घरापर्यंत पोहोचला आहे. कलमठ ग्रामपंचायतच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला ग्रामस्थानी प्रतिसाद देत कौतुक केले. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते या रथाचे उद्घाटन करण्यात आले. गणेशोत्सवातील निर्माल्यातून प्लास्टिक नदीमध्ये जाऊ नये, पर्यावरणाचे रक्षण व्हावे , यासाठी कलमठ ग्रामपंचायतीने राबविलेला उफक्रम गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी काढले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये कलमठ ग्रामपंचायत पूर्ण तयारीने सहभागी होणार आहे. त्याचेच हे पहिले पाऊल आहे, त्यासाठी निर्माल्य कलश रथ, स्वच्छ कलमठ संकल्प कलमठवासियांनी आमच्या प्रत्येक आवाहनाला नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे . त्याबद्दल सरपंच या नात्याने आभार मानतो. पहिल्याच दिवशी जवळपास 200 घरातील निर्माल्य संकलन करण्यात आले. असे सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले.

यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, महेश लाड, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सुनील नाडकर्णी, सदस्य नितीन पवार, अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, सचिन खोचरे, पपू यादव, विनिता बुचडे, प्रसाद घाणेकर, किशोर लाड, आबा कोरगावकर, अनंत हजारे, तेजस लोकरे, मंगेश चिंदरकर, गुरु वर्देकर, जयराम चिंदरकर, प्रथमेश धुमाळे, प्रथमेश मठकर, परेश कांबळी, शाम वर्देकर आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट