हिंदुस्थान-रशियाला चीनच्या हाती गमावलं, टॅरिफ वॉर दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि रशियाची चीनशी वाढत्या जवळिकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिलं आहे की, “असं वाटतंय की आपण हिंदुस्थान आणि रशियाला चीनच्या हाती गमावलं आहे. आशा आहे की त्यांची ही साथ दीर्घ आणि समृद्ध असेल.” ट्रम्प यांचं हे वक्तव्य हिंदुस्थानवर लादलेल्या 50 टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर आलं आहे, ज्यामुळे हिंदुस्थान-अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावरून टॅरिफ लादले आहे, कारण हिंदुस्थान रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त तेल आयात करत आहे. त्यांचा दावा आहे की, यामुळे रशियाला युक्रेन युद्धासाठी अप्रत्यक्षपणे आर्थिक मदत मिळत आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी चीनवर 145 टक्के इतका मोठा कर लादला, परंतु हा निर्णय 90 दिवसांसाठी पुढे ढकलला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List