आरामबसची ट्रक्टर ट्रॉलीला धडक; दोन मजूर ठार

आरामबसची ट्रक्टर ट्रॉलीला धडक; दोन मजूर ठार

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर चास (ता. अहिल्यानगर) शिवारात आज पहाटे भरधाव वेगातील खासगी आरामबसने ट्रक्टरला धडक दिल्याने ट्रक्टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन मजूर जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शमीम शेख सलीम अख्तर (वय 34, मूळ रा. बिहार) व इनारुल हनीफ शेख (वय 36, मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत. तर जखमींची नावे समजू शकली नाहीत.

मयत व जखमी हे पाचही जण परप्रांतीय असून, मजुरी करण्यासाठी अहिल्यानगर तालुक्यात आले होते. ते पहाटेच्या सुमारास कामावर जाण्यासाठी चासकडून नगरकडे ट्रक्टर ट्रॉली घेऊन येत होते. पहाटेच्या सुमारास चासच्या पुढे एका हॉटेलजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या खासगी आरामबसने ओव्हरटेक करत असताना अचानक वळण घेतले. त्यामुळे बसची ट्रक्टरला धडक बसून, ट्रक्टर ट्रॉलीसह पलटी झाला. त्याखाली दबून दोघे जागीच ठार झाले, तर तिघे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले, तर मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी नगर तालुका ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार, की पक्षातील वाचाळवीरांचं? अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
भाजपचे वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. पडळकर यांनी जयंत...
…अन्यथा पैसे बंद होणार! ऐन सणासुदीत लाडक्या बहि‍णींच्या डोक्याला ताप, महायुती सरकारनं दिलं नवं टास्क
पिवळ्या दातांवर ‘हा’ आहे जालीम उपाय, वाचा
केसांमधील उवा होतील चुटकीसरशी गायब, वापरा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
AI च्या आभासी जगात स्वप्नरंजन करण्यापेक्षा खऱ्या जीवनाचा आनंद अनुभवा; शंतनू नायडूचा मोलाचा सल्ला
मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा धमकीचा मेल; पोलिसांकडून झाडाझडती, तपास यंत्रणा अलर्ट
बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा! शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, पडळकरांच्या विधानाचा केला निषेध