Panvel News – जामीनावर सुटलेल्या आरोपीचा पोलिसांवर कुऱ्हाडीने घाव, दोघे जखमी
एका खूनाच्या प्रकरणात जामीनावर सुटलेल्या आरोपीने पोलिसांवरच कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. या भयंकर हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे हल्लेखोराने 16 वर्षीय पुतनीला ओलीस ठेवत तिच्या गळ्यावर कोयता ठेऊन पोलिसांना धमकी दिली. या घटनेमुळे पनवेल शहर हादरून गेलं असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोबन बाबुलाल महातोने बुधवारी (3 सप्टेंबर 2025) पनवेल शहरातील मंगला निवास इमारत स्वत:च्या मालकीची असल्याचा दावा केला. तसेच एका खोलीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि दमदाटी सुरू केली. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने पोलिसांवरच कुऱ्हाडीने आणि कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस सम्राट डाकी आणि रविंद्र पारधी हे गंभीर जखमी झाले. तर इतर पोलिसांना किरकोळ मार लागला आहे. गंभीर बाब म्हणजे सोबनने 16 वर्षीय पुतनीला ओलीस ठेवत तिच्या गळ्यावर कोयता ठेवून पोलिसांना धमकी दिली. अखेर रात्री त्याला पोलिसांना अटक केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List