नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांवर आपत्ती; दिल्ली, पंजाब, हरयाणातील पूरस्थितीवरून आदित्य ठाकरे यांचा केंद्रावर निशाणा
दिल्ली, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. नियोजनाच्या अभावामुळे सामान्य नागरिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत आहे, असं ते म्हणाले आहेत.
X वर एक पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “उत्तर भारतातील अनेक राज्ये सध्या निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात आहेत. या संकटात सापडलेल्या सर्व नागरिकांप्रति माझी सहानुभूती आहे. मात्र, ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, प्रशासकीय नियोजनातील गंभीर त्रुटींचा परिणाम आहे.”
ते पुढे म्हणाले, “केंद्र सरकार राज्य सरकारांना आणि या भागातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत देईल, अशी आशा करतो. ही आपत्ती आता दशकातून एकदा घडणारी घटना राहिलेली नाही. प्रत्येक राज्याला या हवामान संकटाचा सामना करावा लागत आहे. डोंगरफोड, झाडांची कत्तल, नद्यांचे मार्ग बदलणे आणि इतर अनेक कृतींचा हा थेट परिणाम आहे.”
आदित्य ठाकरे यांनी हिंदुस्थान हवामान संकटाच्या उंबरठ्यावर असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, “आता केवळ तात्काळ बचाव, मदत आणि नुकसानभरपाई पुरेशी नाही. हिंदुस्थान आणि हिंदुस्थानींच्या भविष्यासाठी हवामान बदलाविरोधात ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List