पोर्तुगालमध्ये भीषण अपघात, लिस्बनमध्ये केबल ट्राम पटरीवरून कोसळली; 15 जणांचा मृत्यू
पोर्तुगालमधील लिस्बनमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. धावती केबल ट्राम पटरीवरून पलटून इमारतीला धडकली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. अपघातावेळी केबल ट्राममध्ये स्थानिक नागरिक आणि पर्यटक होते. ट्रामखाली अनेक प्रवासी अडकल्याची माहिती मिळते. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
केबल तुटल्याने ट्रामचा ट्रॅकवरून तोल गेला आणि ट्राम इमारतीवर कोसळली. अपघातात ट्रामचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत या अपघातात 15 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. अपघातानंतर स्थानिक नागरिकही मदत कार्यात सहभागी झाले. मृतांमध्ये स्थानिक नागरिक आणि परदेशी पर्यटकांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List