मुंबई-गोवा महामार्गावर गणेशभक्तांसाठी आरोग्य दूत, ‘मेडिकल इमर्जन्सी’साठी चाकरमान्यांना तत्काळ मदत

मुंबई-गोवा महामार्गावर गणेशभक्तांसाठी आरोग्य दूत, ‘मेडिकल इमर्जन्सी’साठी चाकरमान्यांना तत्काळ मदत

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर दहा आरोग्य पथके तैनात केली आहेत. २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान १० वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असणार आहे. त्यामुळे अपघात किंवा अन्य घटना घडल्यास चाकरमान्यांना तत्काळ मदत मिळणार आहे.

गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. कोकणात घराघरात गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपापल्या गावी जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करतात. यामुळे महामार्गावरील वर्दळीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. वाढती वाहतूक लक्षात घेता अपघाताचीही शक्यता निर्माण होते तसेच प्रवाशांना केव्हाही वैद्यकीय गरज भासू शकते, हे लक्षात घेऊन आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

खारपाडा, खारपाले, कोलाड, इंदापूर…

आरोग्य पथकात दिवस-रात्र १ वैद्यकीय अधिकारी, १ आरोग्य सेविका, १ आरोग्य कर्मचारी, १ वाहनचालक आवश्यक त्या प्राथमिक औषधोपचाराच्या साहित्यासह कार्यरत असणार आहेत. तसेच आरोग्य पथकाला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. गणेशभक्तांना वैद्यकीय सुविधेत कोणतीही कमतरता भासणार नाही. याची खबरदारी आरोग्य विभाग घेत असल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी मनीषा विखे यांनी दिली आहे. खारपाडा (जिते), खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड (मोपराब्रिज), महाड एमआयडीसी (टोल फाटा), पोलादपूर (लोहारमाळ) या ठिकाणी ही पथके तैनात असणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या...
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट
हिंदुस्थान-रशियाला चीनच्या हाती गमावलं, टॅरिफ वॉर दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य
Photo – राशाने दाखवला अ‍ॅटिट्यूड