जळगावच्या महिलेचा शिमल्यात अपघाती मृत्यू, पर्यटनासाठी गेली असता बसवर दरड कोसळली

जळगावच्या महिलेचा शिमल्यात अपघाती मृत्यू, पर्यटनासाठी गेली असता बसवर दरड कोसळली

हिमाचल प्रदेशात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर, भूस्खलनाच्या घटना सुरूच आहेत. शिमल्यामध्ये पर्यटकांच्या बसवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील महिलेसह दोन पर्यकांचा मृत्यू झाला असून 15 पर्यटक जखमी झाले आहेत. लक्ष्मी विराणी असे मयत महिला पर्यटकांचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

लक्ष्मी ही कंपनीतील सहकाऱ्यांसह हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेली होती. यादरम्यान शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यात हिंदुस्थान-तिबेट मार्गावरील बिथल परिसरात मुसळधार पावसामुळे त्यांच्या बसवर दरड कोसळली. यात लक्ष्मीसह दोघांचा मृत्यू झाला. लक्ष्मीचा मृतदेह रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर लक्ष्मीचा मृतदेह तिचे सहकारी तरुण रामचंदानी यांच्या ताब्यात देण्यात येईल. जखमींना उपचारासाठी रामपूरच्या खानरी येथील महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्रात दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा प्रशासनाने शिमला जिल्हा प्रशासन आणि हिमाचल प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधला आहे. कागदपत्रांची पूर्तता करून लक्ष्मीचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळ्यात नक्की लावा जांभळाचे झाड, चवीसोबत आरोग्याचाही मिळेल ‘डबल डोस’ पावसाळ्यात नक्की लावा जांभळाचे झाड, चवीसोबत आरोग्याचाही मिळेल ‘डबल डोस’
पावसाळा (Monsoon) हा कोणत्याही झाडाच्या वाढीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या दिवसात भरपूर पाणी मिळत असल्यामुळे बियांचे अंकुरण लवकर होते...
टेकऑफच्या तयारीत असतानाच पक्षी धडकला, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान रद्द
Thane News – लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना तोल गेला, विटावा खाडीत तरुण पडला; शोधकार्य सुरू
Latur News – अज्ञात महिलेच्या हत्येचा उलगडा, पतीसह पाच जणांना अटक
नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांवर आपत्ती; दिल्ली, पंजाब, हरयाणातील पूरस्थितीवरून आदित्य ठाकरे यांचा केंद्रावर निशाणा
Panvel News – जामीनावर सुटलेल्या आरोपीचा पोलिसांवर कुऱ्हाडीने घाव, दोघे जखमी
हिंदुस्थानवर टॅरिफ यूक्रेन शांततेसाठी आवश्यक, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात ट्रम्प प्रशासनाचा युक्तिवाद