Bihar Election 2025 – बिहार विधानसभा निवडणुकीची ऑक्टोबरमध्ये होणार घोषणा? तीन टप्प्यात मतदान; वाचा सविस्तर माहिती
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ची अधिकृत घोषणा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात तारखा जाहीर करण्याची तयारी केली असून, मतदान नोव्हेंबर महिन्यात दोन किंवा तीन टप्प्यांत पार पडण्याची अपेक्षा आहे. ही निवडणूक २२ नोव्हेंबर २०२५ च्या मुदतीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
‘एबीपी न्यूज’ने निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दसऱ्यानंतर निवडणुकीची घोषणा केली जाईल, तर छठ पूजेनंतर मतदान तारखा ठरवल्या जातील. मतमोजणी १५ ते २० नोव्हेंबर २०२५ दरम्यान होण्याची शक्यता आहे. यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांनी तयारीला वेग दिला आहे.
मतदार यादीत बदल आणि वाद
बिहारमध्येही मतदार यादीच्या विशेष फेर तपासणीच्या (Bihar SIR) प्रक्रियेनंतर मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध झाला असून, या महिन्याच्या अखेरीस अंतिम यादी जाहीर होईल. या प्रक्रियेदरम्यान डुप्लिकेट नावे आणि मृत मतदारांची नावे काढली गेल्याने मतदारांची संख्या यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा कमी झाली आहे. यावर बोलताना वडणूक आयोगाने सांगितले की, ही प्रक्रिया पारदर्शक आहे आणि चुकीची नावे काढण्यात आली आहेत. मात्र विरोधी पक्षांनी भाजप आणि निवडणूक आयोग एसआयआरच्या नावाखाली बिहारमध्ये मतचोरीची करण्याची तयारी करत असल्याचा आरोप केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List