अवाजवी भाडे, प्रवाशांशी उद्धट वागणाऱ्या रिक्षा व बस वाहतूकदारांची आता थेट तक्रार करता येणार

अवाजवी भाडे, प्रवाशांशी उद्धट वागणाऱ्या रिक्षा व बस वाहतूकदारांची आता थेट तक्रार करता येणार

अवाजवी भाडे आकारणी तसेच प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षा व बस वाहतूकदारांची तक्रार नागरिकांनी ८२७५१०१७७९ या Whatsapp क्रमांकावर वाहनाच्या व प्रवासाच्या तपशिलासह करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना, बस वाहतुकदार संघटना यांच्यासोबत वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस तसेच रेल्वे पोलीस यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पाडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर तसेच कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते. त्याचप्रमाणे पोलीस उप निरीक्षक (वाहतूक शाखा) शरद घाग, पो.उप निरीक्षक (महामार्ग पोलीस) चंद्रशेखर जाधव, वरिष्ठ निरीक्षक रेल्वे पोलीस सतिश विभुते, विभागीय वाहतुक अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह सर्व रस्ता कंत्राटदारांचे प्रतिनिधी, बस वाहतुकदार संघटना व रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी करपे म्हणाले, सर्व रिक्षा धारकांनी त्यांची वाहने रिक्षा स्टॅण्ड वर शिस्तबद्ध पध्दतीने वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेत लावावीत तसेच अवाजवी भाडे आकारणी करणे व प्रवाशांशी कोणत्याही प्रकारचे उद्धट वर्तन करू नये, वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुक करू नये, याबाबत त्यांना सुचित करण्यात आले. सर्व वाहन मालकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत,याची खात्री करावी.

बस वाहनधारकांनी बसमध्ये आपत्कालीन दरवाजा, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असल्याचे खात्री करावी. बस चालकांनी मद्यप्राशन करून बस चालवू नये, तसेच त्यांना पुरेशी विश्रांती व झोप मिळेल याची ही काळजी बस मालकांनी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. बस मालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडयाची मागणी करू नये, याबाबत त्यांना सूचित करण्यात आले.

राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी एसटी बस चालवताना सुरक्षिततेविषयी पुरेशी काळजी घेऊन बस चालवावी. वाहतुकीची कुठेही कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. परिवहन महामंडळाने रेल्वेच्या वेळापत्रकाशी सुसंगत वेळेत एसटी बसच्या रेल्वे स्टेशनसाठीच्या फेऱ्यांचे नियोजन करावे, अशाही सूचना श्री. करपे यांनी यावेळी दिल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;