राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा विचार करून ओला दुष्काळ जाहीर करा: हर्षवर्धन सपकाळ

राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा विचार करून ओला दुष्काळ जाहीर करा: हर्षवर्धन सपकाळ

राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणतात की, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १७ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे, उत्तर महाराष्ट्र व कोकणातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबिन, मूग, कापूस, तूर, फळे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे, हजारो हेक्टरवरील ऊसालाही मोठा फटका बसला आहे, काही ठिकाणी शेतकऱ्याचे पशूधन वाहून गेले आहे तर नांदेड जिल्ह्यात जिवीतहानीही झाली आहे. आधीच संकटाचा सामना करत असलेल्या बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात टाकले आहे.

राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी सरकारने या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी व शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे. जेथे जिवीतहानी झाली आहे त्यांच्या कुटुंबियांचा सहानुभूतीपूर्ण विचार करून मदत करावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पश्चिम बंगाल विधानसभेत घातला गोंधळ, भाजपचे 5 आमदार निलंबित पश्चिम बंगाल विधानसभेत घातला गोंधळ, भाजपचे 5 आमदार निलंबित
गुरुवारी पश्चिम बंगाल विधानसभेत विशेष अधिवेशनादरम्यान भाजप आमदार आणि मार्शलमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीनंतर भाजप आमदार आणि मुख्य प्रतोद शंकर...
पोर्तुगालमध्ये भीषण अपघात, लिस्बनमध्ये केबल ट्राम पटरीवरून कोसळली; 15 जणांचा मृत्यू
राजधानी दिल्लीला पुराचा तडाखा, यमुना नदी खवळली; हजारो संसार वाहून गेले, जनजीवन विस्कळीत
Bihar Election 2025 – बिहार विधानसभा निवडणुकीची ऑक्टोबरमध्ये होणार घोषणा? तीन टप्प्यात मतदान; वाचा सविस्तर माहिती
क्रिकेट म्हणजे माझं पहिलं प्रेम… हिंदुस्थानच्या आणखी एका खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा
Amit Mishra Retirement – अश्विननंतर टीम इंडियाचा आणखी एक फिरकीपटू निवृत्त, सचिन तेंडुलकरहून जास्त काळ खेळलाय क्रिकेट
जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं