पर्यटकांसाठी खूशखबर, मुंबईतील 229 कोटींच्या प्रवासी जेट्टीवर शिक्कामोर्तब; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या याचिका

पर्यटकांसाठी खूशखबर, मुंबईतील 229 कोटींच्या प्रवासी जेट्टीवर शिक्कामोर्तब; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या याचिका

गेट वे ऑफ इंडियाजवळ तब्बल 229 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने आज मोकळा केला. या जेट्टीविरोधातील सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यामुळे या जेट्टीचे काम आता लवकरच सुरू होईल.

सरन्यायाधीश भूषण गवई व न्या. विनोद चंद्रन यांच्या खंडपीङ्गासमोर या याचिकांवर सुनावणी झाली. स्थानिकांची बाजू न ऐकताच हा प्रकल्प उभारला जात आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला, मात्र हा प्रकल्प स्थानिकांसाठी मर्यादित नसून सर्व मुंबईकरांसाठी आहे, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात स्पष्ट केले. उभयंतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या.

मुंबई केवळ ताज हॉटेलपुरती नसून ठाणे, डोंबिवलीतील नागरिकांचीसुद्धा आहे. या जेट्टीचा लाभ सर्वांना मिळणार आहे, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले. गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने या जेट्टीविरोधात क्लीन हेरिटेज कुलाबा रहिवासी असोसिएशन व अन्य यांनी केलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या.

याचिकाकर्त्यांचा दावा

अरुंद अशा एका टोकाकडच्या रस्त्यावर हे काम होणार आहे. याने येथे वाहतूककोंडी होईल. गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांना याचा नाहक त्रास होईल. येथील फेरीवाल्यांच्या रोजगारावर गदा येईल, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

राज्य शासनाचा युक्तिवाद

गेट वे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लबदरम्यान बांधण्यात येणाऱ्या जेट्टीमुळे मुंबईला जोडणारी जलवाहतूक अधिक सुकर होईल. या बांधकामासाठी हेरिटेज कमिटी, वाहतूक विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. या कामाकरिता कुठल्याही स्फोटकांचा वापर होणार नाही. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या जातील, असा युक्तिवाद राज्य शासनाने केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;