महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम सोलापुरात तयार

महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम सोलापुरात तयार

आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेली ही टीम महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम ठरली असून, महिलांच्या सहभागामुळे बचावकार्य अधिक प्रभावी आणि समावेशक होणार आहे. पहिली महिला रेस्क्यू टीम कोल्हापूरमध्ये करण्यात आली आहे.

पंढरपूरच्या एकादशीच्या काळात वारकरी महिलांचे नदीत वाहून जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. अशावेळी बचावकार्यात पुरुषांना मर्यादा येतात. ही गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने महिलांची स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्याचा निर्णय घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

महिला रेस्क्यू टीमला इंडियन रेस्क्यू ऍकॅडमीच्या प्रशिक्षकांकडून सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये आपत्तीची ओळख, सीपीआर, स्ट्रेचर तयार करणे, प्राथमिक उपचार, बोट हाताळणी, दोरीचा वापर, गर्दी नियंत्रण, प्रशासनाशी समन्वय, अशा अनेक बाबींचा समावेश आहे. या महिलांना विजापूर रोडवरील महाराष्ट्र एज्युकेशन हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रशिक्षण, तर हिप्परगा तलाव येथे प्रात्यक्षिके घेतली जात आहेत.

युवतींचा उत्स्फूर्त सहभाग

रेखा राठोड, उर्मिला पवार, अरुणा राठोड, रूपाली दोरकर, दुर्गा बनसोडे, जयश्री भिसे, शुभांगी गवते, नागोबाई बिराजदार, चैताली सावंत, लावण्या गुंडला, सोनिया चौगुले, राजश्री दोरनहळ्ळी, आस्मा शेख, पूजा जगताप, सुवर्णा गायकवाड या महिलांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवला आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱया ‘आपदा सखीना’ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रमाणपत्र आणि सुरक्षा कीट देण्यात येणार आहे.

बचावकार्यात प्रशिक्षित व्यक्तींची गरज असते. महिलांचा बचाव करताना महिलाच पुढे आल्या तर कार्य अधिक प्रभावी होते. सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही गरज ओळखून महिला रेस्क्यू टीम तयार केली आहे, ही जिह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

– शक्तिसागर ढोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सोलापूर.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मराठा आरक्षणाच्या ‘जीआर’चा टाचणीएवढाही उपयोग नाही! ना सरसकट, ना सगेसोयरे, मराठे पुन्हा तहात हरले? सरकारने फसवल्याची मराठा तरुणांमध्ये भावना मराठा आरक्षणाच्या ‘जीआर’चा टाचणीएवढाही उपयोग नाही! ना सरसकट, ना सगेसोयरे, मराठे पुन्हा तहात हरले? सरकारने फसवल्याची मराठा तरुणांमध्ये भावना
मराठे युद्धात जिंकले, पण तहात हरले असा दाखला इतिहासातील घटनांवरून दिला जातो. मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीतही असेच घडल्याची प्रतिक्रिया मराठा...
कोणीही शंका घेऊ नका, तीळमात्रही नको, कोणाही विदूषकाचे, अविचारी माणसाचे ऐकू नका, सर्व मराठे ओबीसीत जाणार म्हणजे जाणार – जरांगे
सरकारी ‘जीआर’ला 100 पैकी मायनस शून्य गुण देतो! विनोद पाटलांचा हल्ला
ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा मंत्रिमंडळ उपसमिती! 2020 च्या जीआरला फोडणी, महायुती सरकारची चलाखी
सामना अग्रलेख – इतरांनाही माता आहेत! मोदींच्या भारतमातेचा अपमान कोणी केला?
लेख – ऑनलाइन बेटिंग स्कॅमचा विळखा
आभाळमाया – वेरा रुबिन