मेहुल चोक्सीला बेल्जियम कोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियमच्या न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. चोक्सीची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. सीबीआयच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून 11 एप्रिल रोजी एंटवर्क पोलिसांनी त्याला अटक केली होती. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ तो तुरुंगात बंद आहे. चोक्सीने त्याला तुरुंगात न ठेवता, घरातच नजरकैदेत ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली होती. परंतु न्यायालयाने सीबीआयने सादर केलेल्या ठोस पुराव्याच्या पार्श्वभूमीवर चोक्सीची जामीन याचिका फेटाळून लावली. चोक्सीने यापूर्वीही कोर्टाच्या कार्यवाहीपासून पळण्याचा प्रयत्न केला आहे. जामीन मिळाल्यानंतर त्याने दुसऱ्या देशाचा आसरा घेतला होता, असे स्पष्ट करत सीबीआयने याबाबतचे ठोस पुरावेही न्यायालयाला सादर केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List