पाणी तुंबले, घर-झाड पडले, भिंत कोसळली; दोन दिवसांत महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये 3500 तक्रारी

पाणी तुंबले, घर-झाड पडले, भिंत कोसळली; दोन दिवसांत महापालिकेच्या  कंट्रोल रूममध्ये 3500 तक्रारी

मुंबईत 18 आणि 19 ऑगस्टला  झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये तब्बल साडेतीन हजार तक्रारी पह्नवरून आणि ऑनलाइन दाखल झाल्या. या सर्व तक्रारींची दखल घेऊन निपटारा केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून अत्यंत तत्परतेने आणि जलदगतीने कार्यवाही करण्यात आली. पालिका आयुक्त-प्रशासक भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे शेकडो कर्मचारी अहोरात्र काम करीत होते. अतिवृष्टीच्या 48 तासांच्या कालावधीत 18 कर्मचारी आपत्कालीन नियंत्रण कक्षातच मुक्कामी राहून सलगपणे कार्यरत होते. या कालावधीत महानगरपालिकेच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर आलेल्या तक्रारांमध्ये पाणी साचणे, झाडे, फांद्या, घरे किंवा भिंती पडणे यासंबंधीत तक्रारी आणि भरती, ओहोटी, वाहतुकीसंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या कॉल्सचा समावेश होता.

रेल्वे प्रवाशांचे हाल

बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने उपनगरी रेल्वेच्या रुळांवर साचलेले पाणी ओसरले. मात्र तिन्ही रेल्वे मार्गांवर दिवसभरात जवळपास 150 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या. त्याचा संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम झाला. लोकल फेऱया निर्धारित वेळेपेक्षा 20 ते 35 मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांचे हाल झाले.

एनडीआरएफ, अग्निशमन दलाची जिगरबाज कामगिरी

कुर्ला भागातील क्रांतिनगर येथे दरडप्रवण परिसरातील सुमारे 350 नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम त्यांनी केले. तसेच त्यांचे निवास, भोजन आणि आरोग्यविषयक सेवा देण्यात आली. चेंबूर येथे मोनोरेलमध्ये अडकलेल्या 582 प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्याची जिगरबाज कामगिरी पालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने पार पाडली.

पिंपरी शहरात झालेल्या संततधार पावसामुळे व धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं
अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची किंवा सकाळी काही नाश्ता करून मग थोड्यावेळाने अंघोळ करण्याची सवय असते. पण काहीजण कधी कधी काही...
Video नांदेडमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाची वाट खडतर, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे भाविकांचे हाल
GSTच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता केंद्राला बदल करण्याचे सुचले, अंबादास दानवे यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल